खानापूर तालुक्यातील भाळवणी सर्वसेवा सहकारी सोसायटी येथील शेतकरी सभागृह व शुगरकेन हार्वेस्ट मशीनचे जलसंपदा मंत्री मा.ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

खानापूर तालुक्यातील भाळवणी सर्वसेवा सहकारी सोसायटी येथील शेतकरी सभागृह व शुगरकेन हार्वेस्ट मशीनचे जलसंपदा मंत्री मा.ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण


खानापूर : भाळवणी सर्वसेवा सहकारी सोसायटी लि. भाळवणी ता. खानापूर जि. सांगली यांच्या वतीने उभारलेल्या शेतकरी सभागृह व शुगरकेन हार्वेस्ट मशीनचे लोकार्पण आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी माजी चेअरमन व संचालक संजयकुमार मोहिते, चेअरमन जयकर नलावडे, व्हा.चेअरमन सविता पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, जि.परिषद सदस्य बाबासाहेब मुळीक व किसन जानकर तसेच सांगोला गावचे आदर्श सरपंच सुशांत देवकर व सर्व संचालक उपस्थित होते. माजी चेअरमन संजयकुमार मोहिते यांच्या वतीने मा.ना.जयंतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.मा.ना.जयंतराव पाटील म्हणाले आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला खरी चालना २००४ ते १४ दरम्यान मिळाली. अलीकडे ग्रामीण भागातील हिताचे निर्णय कमी झाले. खाजगी संस्थांमुळे सहकार क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली. मात्र भाळवणी सर्व सेवा सहकारी सोसायटीने चांगले उपक्रम राबवत या स्पर्धात्मक क्षेत्रात आपली पकड मजबूत केली.


भाळवणी सर्व सेवा सहकारी सोसायटी लि. भाळवणी यांच्या वतीने उभारलेल्या शेतकरी सभागृह व हार्वेस्ट मशीनचे लोकार्पण आज करण्यात आले. एखादी संस्था चांगल्या गोष्टी करीत पुढे जात असेल तर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. असे ट्वीट देखील पाटील यांनी केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad