“बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का भाऊ?” : या शिवसेना नेत्यांचा अभिनेत्री कंगनाला टोला
 “बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का भाऊ?” : या शिवसेना नेत्यांचा अभिनेत्री कंगनाला टोला मुंबई : शिवसेनेसोबत झालेल्या वादानंतर अभिनेत्री कंगना पहिल्यांदाच मुंबईत परतली. मुंबईत राहण्यासाठी केवळ बाप्पाच्याच परवानगीची गरज लागते. इतर कुणाच्या परवानगीची गरज नाही, अशा शब्दांत शिवसेनेला चिंता काढणाऱ्या कंगनाला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी चांगलाच टोला लगावला आहे. उर्मिला यांनी कंगनाचं नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे. कंगना रणौतने मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असं म्हणत तिने शिवसेनेला टोला लगावला.यावर आता माझ्या प्रिय मुंबई शहराच्या पाठी उभं राहण्यासाठी असं म्हणत उर्मिला यांनी बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का भाऊ?, असे ट्वीट करत सवाल केला. उर्मिला यांनी याआधीही कंगनावर हल्लाबोल केला होता.

 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

Previous Post Next Post