Type Here to Get Search Results !

यूपीएच्या चेअरमनपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा
 यूपीएच्या चेअरमनपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा 


नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता आहे. शरद पवार हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची जागा घेऊ शकतात. महाविकासआघाडीप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काहीसा अवकाश असला तरी काँग्रेस आतापासून तयारीला लागलं आहे. 2019मध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा UPA कडून करण्यात आला होता. मात्र त्या निवडणुकीत काँग्रेसचा धोबीपछाड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वत: काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत माघार घेतली. त्यानंतर पुन्हा सगळी सूत्र सोनिया गांधींच्या हाती गेली. मधल्या काळात यावरून अनेक वाद आणि गटबाजी देखील झाली पण भाजपविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत आहे. देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा आहे. शरद पवार ही निवड स्वीकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे.शरद पवार यांच्या माध्यमातून यूपीए अधिक बळकट करण्यासाठी ही राजकीय खेळी असणार आहे. भाजपला रोखण्यासाठी आणि सक्षम पर्याय देण्यासाठी हे मोठे पाऊल उचण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार यांनी चमत्कार करुन दाखवला आहे. शक्य नसताना त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत भाजपला विरोधी पक्षात बसवले आहे. तसेच पवार हे यूपीएतील घटक पक्षांचे नेतृत्व करु शकतात, त्यामुळे ही मोठी राजकीय खेळी मानली जात आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies