सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक डिसले गुरुजीना कोरोनाची लागण

सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक डिसले गुरुजीना कोरोनाची लागण

 सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक डिसले गुरुजीना कोरोनाची लागण सोलापूर : युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. त्यांच्या या कर्तृत्वामुळे जगभरातून डिसले गुरुजींचं कौतुक केलं जात आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली असून माझ्या संपर्कात आलेल्या मंडळींनी कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह महादेव डिसले यांचा दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला होता. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. या सत्कार समारंभासाठी सरकारने डिसले यांच्या आई पार्वती आणि वडील महादेव डिसले यांनाही खास निमंत्रित केलं होतं आणि त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

 
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments