निंबवडे हायस्कुल येथे मास्क, सॅनिटायझर चे वाटप

निंबवडे हायस्कुल येथे मास्क, सॅनिटायझर चे वाटपनिंबवडे हायस्कुल येथे मास्क, सॅनिटायझर चे वाटप 

माणदेश एक्सप्रेस न्युज


निंबवडे : दिनांक ३ रोजी निंबवडे येथील लोकमान्य हायस्कुल निंबवडे ता. आटपाडी, जि. सांगली येथील शाळेत दानशूर नेतृत्व, युवकांचे आधारस्तंभ नामदेव (शेठ) मोटे यांच्या वतीने मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. यावेळी सूर्यकांत हेगडे, बाळू हेगडे, सुयश मोटे, सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.


सध्या जगावर कोरोना चे थैमान  असून लोक या धक्क्यातून सावरत पूर्वपदावर येत आहेत. अशातच शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्याने पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाय योजना म्हणून नामदेव (शेठ) मोटे यांनी शाळेला ही मदत केली आहे. कोरोना काळातही त्यांनी गावकऱ्यांना जीवनाश्यक मालाचे किट वाटप केले होते तसेच गस्त आणि दक्षता पथकात ही त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली होती.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments