शेळ्या-मेंढ्या चोरीच्या संशयावरून वाहनचालकास दिवड ग्रामस्थांची मारहाण ; मारहाणीत वाहन चालकाचा मृत्यूशेळ्या-मेंढ्या चोरीच्या संशयावरून वाहनचालकास दिवड ग्रामस्थांची मारहाण ; मारहाणीत वाहन चालकाचा मृत्यू 

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला : शेळ्या-मेंढ्या चोरीसाठी आलेल्या संशयावरुन वाहन चालकास दिवड ग्रामस्थांनी पकडून अमानुषपणे बेदम मारहाण केली. या वाहन चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, संबंधित दिवड ग्रामस्थांवर खूनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रुग्णवाहिकेत मृतदेह नेत मृताच्या नातेवाईकांसोबतच  धुळदेव येथील ग्रामस्थांनी म्हसवड पोलिस ठाण्यासमोर काल सायंकाळी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर दिवड येथील अज्ञात ग्रामस्थांवर पोलिसांनी काल रात्री उशीरा खुनाचा गुन्हा दाखल केला.


आज सकाळी संबंधित मृताचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  शवविच्छेदन केल्यानंतर पुन्हा संबंधित मृतांचे नातेवाईक व त्यांच्या सोबत धुळदेव येथीलही ग्रामस्थांनी जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेऊन पुन्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रानजिक आंदोलन करण्याचा पवित्रा घेतल्यामुळे  सातारा,वडूज येथील जादा पोलिस कर्मचारी बंदोबस्तास मागविण्यात आला.


याबाबत अधिक माहिती अशी की, दिवड (ता.माण) येथे  ता. २२ नोव्हेंबर च्या रात्री दिवड नजिकच्या दिवडपाटी येथील वीटभट्टी जवळ शेळ्या मेंढ्या चोरणारी संशयित टोळी आली असल्याचे समजताच गावातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी गेले. परंतु चोरट्यानी पलायन केले.


या वेळी चारचाकी वाहन चालक लहुराज पंडा कोळेकर (वय ४०) हे दिवड  ग्रामस्थांच्या हाती सापडले. ग्रामस्थांनी  त्यास डोक्यावर व संपुर्ण शरीरावर गंभीर मारहाण करून चालकास पोलिसांच्या ताब्यात दिले होते. जखमी अवस्थेतील लहूराज कोळेकर यांना त्याच्या नातेवाईकांनी म्हसवड येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ११ दिवसाच्या उपचारादरम्यान त्यांचे काल गुरुवारी (ता.३) निधन झाले.


या घटनेनंतर संबंधित मृताचे नातेवाईकांसह धुळदेव येथील ग्रामस्थांनी मृतास मारहाण केलेल्या दिवड येथील ग्रामस्थांवर खूनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत म्हसवड पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर  पोलिसांनी अज्ञात दिवड ग्रामस्थांच्या विरोधात काल रात्री उशीरा खुनाचा गुन्हा दाखल केला होता.


आज सकाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मात्र मृताच्या नातेवाईकांनी संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यावेळी मृताच्या नातेवाईकांसोबत धुळदेव येथील ग्रामस्थही सहभागी झाले होते. या घटनेचे गांभीर्य पाहता सातारा, वडूज, दहिवडी येथील जादा पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला.  


त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील संबंधित दिवड गावातील संशयित आरोपीस ताब्यात घेण्याबाबतच्या हालचाली जलद गतीने सुरु केल्या असून त्या आज रात्री उशीरापर्यंत सुरुच होती. दरम्यान आजच्या या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. देशमुख यांनी म्हसवड पोलिस ठाण्यास भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे पुढील तपास करीत आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad