प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी कोव्हीड योद्धा पुरस्काराने सन्मानितप्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी कोव्हीड योद्धा पुरस्काराने सन्मानित 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : कोव्हीड-19 च्या जागतिक महामारीच्या काळात कोव्हीड रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे यांच्या हस्ते कोव्हीड योद्धा पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.  


प्राथमिक आरोग्य केंद्र आटपाडी येथे  रुग्ण कल्याण समितीची मिटिंग आयोजित केली होती. यावेळी  कोव्हीड-19 च्या जागतिक महामारीच्या काळात कोव्हीड रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांत कदम आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक/सेविका, परिचर, आशा स्वयंसेविका, वाहन चालक, यांना  कोव्हीड योद्धे म्हणून सन्मान करून गौरविण्यात आले.


यावेळी रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, पंचायत समितीचे उपसभापती रुपेश पाटील, आटपाडी सरपंच सौ. वृषाली पाटील मॅडम, डॉएम.वाय. पाटील, डॉ. उत्कर्ष कवडे, डॉ. गायकवाड आदी उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a Comment

Previous Post Next Post