राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू ; मंत्रालयात जीन्स, टी शर्ट घालण्यावर बंदी

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू ; मंत्रालयात जीन्स, टी शर्ट घालण्यावर बंदी
 राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू ; मंत्रालयात जीन्स, टी शर्ट घालण्यावर बंदी मुंबई : आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू करण्यात आला असून कोणते आणि कसे कपडे सरकारी कार्यालयात घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे आधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करत नसल्यामुळे जनमानसातील सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलीन होते. मंत्रालयाने जाहीर केलेल्या निर्देशात सरकारी कर्मचाऱ्यांना आता जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही. तसेच स्लीपर्सच्या न वापरण्याची सूचना देखील देण्यात आली आहे.एका चांगल्या प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची असते. जर अधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा अशा परिस्थितीत ही अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याच्या एकंदरीत कामकाजावरही त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होतो. महिला कर्मचाऱ्यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असं देखील नव्या नियमांत सांगितले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments