राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस?

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस?  मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून नोटीस पाठवली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांनी यासंबंधी माहिती देताना अद्याप आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी आपल्याला नोटीस येणार असल्याची माहिती मिळाली असल्याचंही सांगितलं आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार आहे.“मला अनेक सुत्रांकडून नोटीस येणार असल्याचं कळालं आहे. जिथपर्यंत मला कळालं आहे ही नोटीस पुण्यातील भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी आहे,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.“ख्रिसमसची सुट्टी असल्याने कदाचित नोटीस अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही. कोणत्याही तपास यंत्रणेने नोटीस पाठवली तरी मी चौकशीला सामोरं जाण्यास पूर्णपणे तयार आहे. मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याचं कारणच नाही,” असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.“या व्यवहाराची चौकशी करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने मला आधीच क्लीन चीट दिली आहे. माझ्याकडे सर्व कागदपत्रं आहेत. निवृत्त न्यायाधीशांच्या आयोगाने केलेल्या चौकशीतही काही समोर आलं नव्हतं,” असंही खडसेंनी सांगितलं.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments