शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस ; यावर संजय राऊत म्हणाले...
 शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस ; यावर संजय राऊत म्हणाले...मुंबई : पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात ईडीने नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत कोणामध्ये किती जोर आहे पाहूया असं म्हणत अप्रत्यक्षपणे ईडीच्या कारवाईला आव्हान दिलं होतं. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.संजय राऊत यांनी यावेळी भाजपावर निशाणा साधला. “मी काही सांगत नसून सगळं भाजपाचे लोक सांगत आहेत. भाजपाचे लोक मला ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. कालपासून पाहतोय अजून कोणी आलेलं नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल. तिथून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल…तर पाहून घेऊ,” असा टोला त्यांनी लगावला आहे.“हे सगळं राजकारण असून ज्यांना करायचं आहे ते करु शकतात,” असंही संजय राऊत यांना यावेळी सांगितलं. “मी दोन वाजता शिवसेना भवनात बोलणार आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad