Type Here to Get Search Results !

एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची बाधा?




 एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची बाधा?



मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी आज आपण ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचं म्हटलं होतं. पण आता त्यांनी आपण १४ दिवस विश्रांती घेऊन त्यानंतर ईडी कार्यालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.  तसंच आपल्याला सर्दी, खोकला आणि ताप आल्याने आपण कोरोनाची चाचणी केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ईडी कार्यालयात जाण्याऐवजी १४ दिवस विश्रांती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एक ट्विट करुन त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. यावरून एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची बाधा झाली आहे का? हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांनी केलेलं हे ट्विट.



या आधी नोव्हेंबर महिन्यातही एकनाथ खडसेंना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना उपचारांसाठी मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांनी ट्विट करुन कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. तसंच संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असंही आवाहन केलं होतं. आज एकनाथ खडसे हे ईडी कार्यालयात आलेल्या नोटीशीमुळे जाणार होते. मात्र ते रद्द करत त्यांनी १४ दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय वैद्यकीय सल्ल्यामुळे घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

 



إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies