“तरीही महिनाभर त्रास दिल्यावर मोदी यांच्या पेशन्सची कमाल लोकांना भावली” : चंद्रकांत पाटील

“तरीही महिनाभर त्रास दिल्यावर मोदी यांच्या पेशन्सची कमाल लोकांना भावली” : चंद्रकांत पाटील
 “तरीही महिनाभर त्रास दिल्यावर मोदी यांच्या पेशन्सची कमाल लोकांना भावली” : चंद्रकांत पाटीलपुणे : जर सर्व शेतकऱ्यांना कृषी कायदा अन्यायकारक वाटला असता तर देशभर आंदोलन झाले असते. परंतु, दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन हे पूर्वग्रहदूषित आणि राजकीय हेतूने करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करा असे अनेकदा म्हणताहेत तरीही महिनाभर त्रास दिल्यावर मोदी यांच्या पेशन्सची कमाल लोकांना भावली, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भूगाव येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यानंतर बोलत होते.पाटील म्हणाले, देशात कृषी कायद्याविरोधात कुठलीही नाराजी नाही. कारण दिल्ली वगळता देशभरात मध्यप्रदेश,कर्नाटक, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा आंध्र प्रदेश अशा कुठेही शेतकरी आंदोलन करण्यात आलेले नाही.महाराष्ट्रातही काँग्रेसने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे कार्यकर्ते वगळता कोणीही रस्त्यावर उतरले नाहीत. देशभरातील शेतकरी कधीच रस्त्यावर नव्हता आणि आता तो यापुढे या कायद्याविरोधात उतरणारही नाही असा विश्वास पाटील यांनी व्यक्त करतानाच पंजाबमधील शेतकऱ्यांचा गैरसमज केला जातोय. दिल्लीतील आंदोलनापाठीमागे राजकीय स्वार्थ दडलेला आहे हे ज्यांच्या लक्षात आले आहे ते आता तिथून पळ काढत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments