प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या आईंचे निधन
 प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या आईंचे निधनमुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांची आई करीना बेगम यांचे निधन झाले. रेहमान यांनी ट्विटरवर आईचा फोटो पोस्ट केला आहे. दिग्दर्शक मोहन राजा, निर्माते डॉ. धनंजयन, गायिका हर्षदीप कौर, श्रेया घोषाल, दिग्दर्शक शेखर कपूर यांसारख्या कलाक्षेत्रातील अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला.वडील व संगीतकार आर. के. शेखर यांच्या निधनानंतर आई करीमा यांनीच रेहमान यांचं संगोपन केलं. आपल्यातील संगीताची आवड व जाण ही सर्वांत आईनेच ओळखली, असं रेहमान यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.  सुरुवातीच्या नकारानंतर आईच्या आग्रहास्तव रेहमान यांनी ‘रोजा’ या चित्रपटाला संगीत दिलं होतं.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

Previous Post Next Post