खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

 खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा  दाखल  पंढरपूर : पंढरपूर शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना खासदार जय सिद्धेश्वर महाराजांनी मतदान केंद्रांमध्ये थेट प्रवेश केला होता. त्यामुळे  राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची खासदार  सिद्धेश्वर महाराजांविरुद्ध पुन्हा दाखल करण्याची मागणी  केली होती. पंढरपूरच्या  कवठेकर प्रशाला येथील 430 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ही घटना घडली होती. त्यामुळे  खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी केली होती. सहायक निवडणूक अधिकारी अनिकेत मानोरकर यांनी गुरुवारी संध्याकाळी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरोधात गुन्हा  दाखल केला आहे.  कलम 171 फ आणि 188 अन्वये  गुन्हा दाखल झाला आहे.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments