Type Here to Get Search Results !

टू व्हिलर-बाईक ड्रायव्हरसह मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी सरकारची नवी नियमावली जारी

 





टू व्हिलर-बाईक ड्रायव्हरसह  मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी सरकारची नवी नियमावली जारी 



नवी दिल्ली :  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, चालकांची सुरक्षा पाहता काही नियमांमध्ये बदल केले असून, काही नवे नियम लागू केले आहेत. टू व्हिलर-बाईक चालकांसाठी सरकारने काही गाईडलाईन्स सांगितल्या आहेत. बाईक ड्रायव्हरच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीसाठीही काही नियमावली जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता टू व्हिलरवर मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही सांगितलेल्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. देशातील वाढते रस्ते अपघात कमी करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत.



मंत्रालयाच्या गाईडलाईन्स नुसार, बाईकच्या मागच्या सीटच्या दोन्ही बाजूला हँड होल्ड आवश्यक आहे. हँड होल्ड मागे बसलेल्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आहे. त्यासोबतच बाईकच्या मागे बसणाऱ्यासाठी दोन्ही बाजूला पायदान अनिवार्य करण्यात आलं आहे. तसंच, बाईकच्या मागच्या चाकाच्या डावा भागातील कमीत-कमी अर्धा भाग सुरक्षितपणे कव्हर व्हावा, जेणेकरून मागे बसणाऱ्याचे कपडे त्यात अडकू नये, असंही सांगण्यात आलं आहे.



रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, बाईकला हलका कंटेनर लावण्याच्या गाईडलाईन्सही दिल्या आहेत. या कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिली आणि उंची 500 मिमीहून अधिक नसावी. जर कंटेनर ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर लावला, तर बाईकवर केवळ ड्रायव्हरलाच मंजूरी असेल. दुसरं कोणीही बाईकवर मागे बसणार नाही. पण कंटेनर दुसऱ्या सीटच्या मागे लावल्यास, दुसऱ्या व्यक्तीला बाईकवर बसण्याची परवानगी आहे.



सरकारने टायरबाबतही नवी नियमावली जारी केली आहे. त्या अंतर्गत अधिकाधिक 3.5 टन वजनापर्यंतच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमची सूचना देण्यात आली आहे. या सिस्टममध्ये लावण्यात आलेल्या सेन्सरद्वारे टायरमध्ये हवेची स्थिती काय आहे, याची माहिती ड्रायव्हरला मिळत राहील. त्याशिवाय मंत्रालयाने, टायर दुरूस्ती कीटचीही शिफारस केली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies