मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
 मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासानवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने विद्यार्थ्यांना आरक्षणाअंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील ८ विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. आर्थिक मागासगटाचं प्रमाणपत्र तहसीलदारांनी द्यावे आणि त्याद्वारे प्रवेश घेण्याची मुभा न्यायालयाने विद्यार्थ्यांना दिली आहे. 
वैद्यकीय क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. याचिकादार विद्यार्थ्यांनी ईडब्लूएसमधून प्रवेश घेतला तर ते शिक्षणासाठी अन्य आरक्षणाचा लाभ घेणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. याचिकादार विद्यार्थ्यांनी याला सहमती दिली असून हमीपत्र देण्यास मान्यता दिली आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

Previous Post Next Post