आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना वॅक्सिन संदर्भात गाईडलाईन्स

आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना वॅक्सिन संदर्भात गाईडलाईन्स

 आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना वॅक्सिन संदर्भात गाईडलाईन्स  नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने वॅक्सिन पोहोचवण्यासाठी गाईडलाईन्स दिल्या आहेत. देशभरात कोरोनाचे प्रमाण कमी होत असताना कोरोना बहुप्रतिक्षित कोरोना वॅक्सिनच्या  वितरणाची तयारी वेग धरु लागलीय. वर्षभर कोरोनासोबत लढाई सुरु असताना आता लवकरच कोरोना वॅक्सिन जनतेपर्यंत पोहोचणार आहे. सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असणाऱ्यांना हे वॅक्सिन दिले जाणार आहे. प्रत्येक बूथवर शंभर जणांना वॅक्सिन दिले जाईल. गाईडलाईन्सनुसार प्राथमिकता ठरवण्यात येणार आहे.भारतामध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा ९८ लाख ५७ हजार २९ झालाय. यामधील ९३ लाख ५७ हजार ४६४ जण उपचारानंतर ठीक झाले आहेत. तर ३ लाख ५६ हजार ५४६ जण अजूनही एक्टीव्ह रुग्ण आहेत. कोरोना प्रतिबंधक 'लस'च्या आपत्कालीन परवान्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी केलेले अर्ज केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने प्रलंबित ठेवलेत. 'कोरोना लस'बाबत आणखी तपशील सादर करण्याची सूचना समितीने दोन्ही कंपन्यांना केली आहे. त्यामुळे कोरोनावरील 'लस'ची  वाट पाहणाऱ्या भारतीयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोरोनावरील 'लस'च्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची मागणी करणारे अर्ज फायझर कंपनीपाठोपाठ सीरम इन्स्टिटय़ूट आणि भारत बायोटेक यांनी केले होते. या तिन्ही कंपन्यांच्या अर्जाबाबत तज्ज्ञ समितीने काल चर्चा केली. 'कोरोना लस'च्या परिणामकारकतेच्या दाव्याला बळकटी देणाऱ्या तपशिलाची गरज असल्याचे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. मात्र तिन्ही कंपन्यांनी हा तपशील सादर केलेला नाही. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments