कोव्हॅक्सिनची लस टोचूनही हरियाणाचे आरोग्य मंत्री कोरोना बाधित

कोव्हॅक्सिनची लस टोचूनही हरियाणाचे आरोग्य मंत्री कोरोना बाधितकोव्हॅक्सिनची लस टोचूनही हरियाणाचे आरोग्य मंत्री कोरोना बाधित  


चंदीगड : हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मंत्री अनिल विज यांनी चाचणी दरम्यान कोव्हॅक्सिनची (Covaxin) लस घेतली होती. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. याबाबत मंत्री अनिल विज यांनी स्वत: ट्विटरवरुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगत संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.  


मंत्री अनिल विज यांनी ट्विट करुन आपल्याला कोरोना झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, “माझी कोरोना चाचणी करण्यात आली. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सरकारी रुग्णालय अंबाला इथे दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी”आरोग्य मंत्री असलेले अनिल विज यांनी गेल्याच महिन्यात कोरोना लसीची चाचणी स्वत:वर करुन घेतली होती. 20 नोव्हेंबरला त्यांना कोव्हॅक्सिन (Covaxin) लस देण्यात आली होती. लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून सर्वात आधी मी स्वत:ला लस टोचून घेईन असं त्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते.  Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments