मला मंत्रालयात कसे येता येईल?...रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला सवाल

मला मंत्रालयात कसे येता येईल?...रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला सवालमला मंत्रालयात कसे येता येईल?...रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला सवाल

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी जर मंत्रालयात रंगीत कपडे घालण्यास मनाई केली तर मी मंत्रालयात येवू कसा असा सवाल केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे सरकारला विचारला आहे.


राजकीय नेतेमंडळी म्हणजे पांढरे शुभ्र कपडे, डोळ्याला गॉगल अशी सर्वसाधारण धारणा होती. त्यानंतर अलीकडे मोदी जॅकेट परिधान करणारी नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु याला अपवाद मात्र रिपाई (आठवले) चे रामदास आठवले आहेत. रामदास आठवले हे कायम रंगीबेरंगी कपड्यातच पहावयास मिळतात. रंगीत कपडे परिधान करून त्यावर एखादं जॅकेट घालून सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावतात. त्यामुळे रंगीत पेहरावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रामदास आठवले यांनी थेट ठाकरे सरकारला एक प्रश्न विचारला. “राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबेरंगी आणि नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई करण्यात आली आहे. अशी मनाई जर मंत्र्यांनाही लागू केल्यास मला मंत्रालयात कसे येता येईल?”, असा सवाल त्यांनी विचारला आहे.शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पोशाख कसा असावा याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. आपली वेशभूषा ही शासकीय कार्यालयास अनुरूप ठरेल याची काळजी घ्यावी. सरकारी कार्यालयात काम करणारे अधिकारी-कर्मचारी विशेषत: कंत्राटी किंवा सल्लागार म्हणून काम करणारे शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरूप पोषाख घालत नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होत असल्याचे सांगत राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांसाठी पेहराव कसा असावा याची बंधने घातली आहेत.


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेसPost a comment

0 Comments