Type Here to Get Search Results !

कोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक कसा? ; मोठी खबरदारी घेण्याची आवश्यता : जागतिक आरोग्य संघटना

 कोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक कसा? ; मोठी खबरदारी घेण्याची आवश्यता : जागतिक आरोग्य संघटना नवी दिल्ली :  कोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे युरोपिय देशांनी कडक निर्बंधांसह लॉकडाऊन घालावा, असे आवाहन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने युरोपिय देशांना सूचना देताना सांगितले आहे की, आधीच्या कोरोनापेक्षा ७० टक्के अधिक संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मोठी खबरदारी घेण्याची आवश्यता आहे. ब्रिटनमध्ये कोरोना नवीन प्रजातीमूळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. साधारणपणे आठवड्यापूर्वी युनायटेड किंगडम येथे संशोधकांना कोरोना विषाणूचा नवीन प्रकार 13 डिसेंबरला आढळला आहे, त्याचे नाव VUI 202012/01 व ज्याचे उत्परिवर्तन spike मध्ये होत आहे. ब्रिटनचे आरोग्य सचिवांच्यानुसार या नवीन COVID 19 च्या प्रकाराचा प्रसार अतिशय झपाट्याने होतो. ज्याच्यामुळे अधिक रुग्णसंख्या वाढत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी अतिशय कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.


म्युटेशन म्हणजे व्हायरसच्या जेनेटिक सिक्वेन्समधला बदल. कोरोना हा आरएनए व्हायरस आहे. त्याचे रेणू ज्या क्रमात रचलेले असतात त्या संरचनेत इथे बदल होतो. या नव्या व्हायरसवरच्या स्पाइक प्रोटिनची रचना बदलेली आहे. या स्पाइक प्रोटिनद्वारे व्हायरस मानवी पेशींमध्ये प्रवेश करतो. हा 40 ते 70% जास्त संसर्गजन्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. शास्त्रज्ञांना अशीही भीती वाटते आहे, की कोट्यवधी लोकांनी लस घेतल्यानंतर अजूनच प्रभावीपणे रूप बदलण्यासाठी कोरोना व्हायरस प्रवृत्त होऊ शकतो.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies