Type Here to Get Search Results !

एका छोट्याश्या अफेयरसाठी हृतिक रोशन कधीपर्यंत रडणार? : अभिनेत्री कंगना
 एका छोट्याश्या अफेयरसाठी हृतिक रोशन कधीपर्यंत रडणार? : अभिनेत्री कंगना मुंबई :  बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना राणौतशी संबंधित प्रकरण आता पुन्हा उघडलं गेलंय. त्यामुळे कंगना आता आणखी एका वादात अडकताना दिसतेय. कंगना-ह्रतिक केस मुंबई क्राईम ब्रँचकडे देण्यात आली आहे. ही केस मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडं होती. आता तिचा तपास क्राईम ब्रँचकडे देण्यात आला आहे. चार वर्षानंतर कंगनाच्या केसचा पुन्हा तपास होणार आहे. ह्रतिकनं केलेल्या तक्रारीची फाईल ओपन झाली आहे. क्राईम बँचचे इंटिलिजन्स युनिट आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे.ह्रतिकनं २०१७ साली या प्रकरणाची सगळी कागदपत्रं सायबर पोलीस स्टेशनला दिली होती. तरीही या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं झाला नाही असा दावा ह्रतिकच्या पक्षाकडून करण्यात आलाय. ह्रतिक या संदर्भात बड्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटला होता असा दावा केला जात आहे.हृतिक रोशनला २०१३ ते २०१४ दरम्यान १०० ईमेल मिळाले होते. कंगना राणौतच्या ईमेल आयडीवरुन हे ईमेल आले होते. हृतिकने २३ मे २०१६ रोजी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार केली होती.माझा ईमेल आयडी हॅक झाला होता असे स्पष्टीकरण कंगनाने यावर दिलं होतं. मी कोणताच ईमेल हृतिक रोशनला केला नसल्याचं तिने म्हटलं होतं. 
त्याची कहाणी आता पुन्हा सुरु झालीय. आमचा ब्रेकअप आणि त्याच्या घटस्फोटाला आता खूप वर्ष झाली. पण त्याला त्या पुढे जायच नाही. कोणत्याही महिलेला तो डेट करत नाहीय. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी करण्यासाठी मी धैर्य करते पण तो तेच नाटक सुरु करतो. एका छोट्याश्या अफेयरसाठी हृतिक रोशन कधीपर्यंत रडणार ? असा प्रश्न कंगनाने विचारलाय. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies