“माझ्याकडे भाजप नेत्यांची यादी आहे” : संजय राऊत

“माझ्याकडे भाजप नेत्यांची यादी आहे” : संजय राऊत
 “माझ्याकडे भाजप नेत्यांची यादी आहे” :  संजय राऊतमुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने कळवले असल्याची माहिती आहे. मात्र, आम्ही दोन चार दिवसांचा वेळ मागितला आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी ईडीच्या नोटीसीवरून पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.'ईडी ही देशाची महत्त्वाची संस्था आहे. जर कुठला कागद हा माझ्या घरी येत असेल तर त्याचा आदर आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. माझ्याकडेही ईडीला देण्यासाठी बरीच कागदपत्र आहे. त्यामुळे नोटीसीला उत्तर हे नोटीसने दिले जाईल' असं राऊत म्हणाले. आम्ही दोन चार दिवसांचा वेळ मागितला आहे.'आम्हाला जी नोटीस देण्यात आली आहे. ती मी अद्याप  पाहिली नाही. ती नोटीस पाहण्याची कोणतीही आवश्यकता नाही. हे राजकारण कशा प्रकारे सुरू आहे, ते आम्हाला चांगले माहिती आहे.  माझ्याकडे भाजप नेत्यांची यादी आहे. त्यांनी केलेल्या व्यवहाराची पूर्ण कागदपत्रे तयार आहे. ही यादी दिल्यानंतर ईडीला जास्त काम मिळणार आहे, असंही राऊत म्हणाले


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments