“देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीतर्फे त्यांचा पराभव होईल” : जयंत पाटील

मुंबई : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालानं सिद्ध होतं असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं आहे. जनमताचा हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. “देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीतर्फे त्यांचा पराभव होईल,” असं म्हणत जयंत पाटलांनी निशाणा साधला.महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र आल्यावर काय होते, हेही या निकालाने दाखवून दिले आहे. अनेकदा तीन चाकी सरकार असं म्हटलं जात होतं. परंतु महाविकास आघाडीची ताकद भाजपाला लक्षात आली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव होण्याइतकी ही भक्कम आघाडी असल्याचे पाटील म्हणाले.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments