जर मी डॉन असती तर तुम्हाला माहीत आहेच ७२ देशांचे पोलीस माझ्या मागावर असते' : कंगना

जर मी डॉन असती तर तुम्हाला माहीत आहेच ७२ देशांचे पोलीस माझ्या मागावर असते' : कंगना

 जर मी डॉन असती तर तुम्हाला माहीत आहेच ७२ देशांचे पोलीस माझ्या मागावर असते' : कंगना मुंबई : कंगना रणौतचं कशावरही वक्तव्य करणं आणि त्यावरून वाद होणं हे काही आता कुणाला नवीन राहिलेलं नाही. जेव्हापासून ती ट्विरवर आली आहे तेव्हापासून एकापाठी एक वाद सुरूच आहेत. आता कंगनाने त्याच्या टिकाकारांवर निशाणा साधणारं ट्विट कलं आहे. कंगनाने तिच्या सपोर्टरकडून करण्यात आलेल्या ट्विटला उत्तर देत लिहिले की, 'तुम्ही काय म्हणताय? मी सध्या या देशातील हॉटेस्ट टार्गेट आहे. माझ्यावर निशाणा साधा आणि मीडियाचे लाडके व्हा. मूव्ही माफिया द्वारे तुम्हाला रोल ऑफर केले जातील. तुम्हाला सिनेमात काम दिलं जाईल. तुम्हाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळणार आणि शिवसेनेचं तिकीटही मिळणार. जर मी डॉन असती तर तुम्हाला माहीत आहेच ७२ देशांचे पोलीस माझ्या मागावर असते'.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments