Type Here to Get Search Results !

“मराठी नंबर प्लेटसाठी दंड आकारणे म्हणजे मराठी भाषेची गळचेपी” : मनसे




 

“मराठी नंबर प्लेटसाठी दंड आकारणे म्हणजे मराठी भाषेची गळचेपी” : मनसे 


मुंबई : मराठी नंबर प्लेटवर होत असलेली कारवाई तातडीने थांबवावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी यासंदर्भातील एक पत्रच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पाठवलं आहे. राजू पाटील यांनी  परिवहन मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये हे पत्र महाराष्ट्रात गाड्यांना लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील नंबर प्लेटवर सुरु असलेली कारवाई तत्काळ थांबविण्याबाबत असल्याचं म्हटलं आहे. “महाराष्ट्रात विविध गाड्यांवर मराठी भाषेत नंबर प्लेट लावलेल्या आहेत. सदर गाड्यांवर आरटीओकडून कारवाई करुन दंड वसुली करण्यात येत आहे. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेतील नंबर प्लेटवर कारवाई होत असल्याने मराठी जनांमध्ये तीव्र नाराजी परसरली आहे,” असं राजू पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.



पुढे राजू पाटील यांनी, “मराठी भाषा संवर्धन व मराठी अस्मितेबाबत माजी परिवहन मंत्री व ज्येष्ठे नेते दिवाकर रावते सभागृहात व विविध स्तरावर वेळोवेळी आग्रही भूमिका घेताना दिसले. त्यांनीच २०१६ मध्ये वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत दुचाकीसह सर्व गाड्यांवर मराठी प्लेट लावण्याबाबत भूमिका जाहीर केली होती. आजही सदर व्हिडीओ युट्यूबवर उपलब्ध आहे. पंरतू आज अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे की, महाराष्ट्रात ‘मराठी अस्मिता’ जपणाऱ्यांवर कारवाई करुन सरकार दंड वसूल करीत आहे,” असा प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे.



मराठी नंबर प्लेटसाठी दंड आकारणे म्हणजे मराठी भाषेची गळचेपी केली जात असल्याचेही राजू पाटील यांनी म्हटलं आहे. “वास्तविक महाराष्ट्रात मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्याबाबत राज्य शासन आग्रही असले पाहिजे होते. तसा कायदाच महाराष्ट्रात केला पाहिजे होता. परंतु तसे न करता सरकारकडून मराठी नंबर प्लेटवर कारवाई करुन सोयीस्कर आपल्याच मातृभाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. 



अशाप्रकारे मराठी भाषेची सरकारकडूनच गळचेपी होत असेल तर भाषेचे संवर्धन व आपली मराठी अस्मिता कशी जपली जाईल, असा प्रश्न निर्माण होतो,” असं राजू पाटील यांनी या पत्रात म्हटलं आहे. या ट्विटमध्ये राजू पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही टॅग केलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies