Type Here to Get Search Results !

तडवळेत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न

 


तडवळेत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : तडवळे येथे ता.आटपाडी,जि.सांगली येथे दादासाहेब हुबाले युवा मंच तडवळे यांच्या वतीने आयोजित भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.


यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, मा.जि.प. सदस्य तानाजी पाटील, पंचायत समिती सदस्य दादासाहेब मरगळे, माजी सरपंच दादासाहेब हुबाले, उपसरपंच जितेंद्र गिड्डे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आटपाडी तालुका युवक अध्यक्ष प्रशांत मोटे, तंटामुक्ती अध्यक्ष विजय यादव, ग्रामपंचायत सदस्य विजय गिड्डे, पोलीस पाटील संजय काळे, माजी उपसरपंच अमोल गवळी, युवा नेते सोमनाथ पावले, हणमंत पावले, बाळासो गिड्डे,  सतीश गिड्डे, सिद्धनाथ कदम, अनिल आईवळे, अनिल (महाराज) दुबुले, मारुती गिरी, अशोक गटकुळे, प्रसाद शेंडे, बापु मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.


या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे ११,१११ रुपयांचे बक्षीस तडवळेचे माजी सरपंच दादासो हुबाले यांच्यावतीने देण्यात आले आहे. तर द्वितीय क्रमांक ७७७७ रुपयेचे बक्षीस आबासाहेब हुबाले (शेठ) यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचे ५५५५ रुपयांचे बक्षीस सतीश गिड्डे यांच्या वतीने देण्यात आले आहे. हणमंत पावले यांच्या वतीने ३३३३ व ११११ रुपयांचे बक्षीस अनुक्रमे हणमंत पावले व अशोक गटकुळे यांच्या वतीने देण्यात आले आहे.   


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस

 
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies