भारताच्या “या” क्रिकेटपटूचा भाजपमध्ये प्रवेश
 भारताच्या “या” क्रिकेटपटूचा भाजपमध्ये प्रवेशतामिळनाडू : गौतम गंभीर याच्यानंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिरकी गोलंदाज आणि समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी आता आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे. शिवरामाकृष्णन यांनी भाजपचे राष्ट्रीय सचिव सीटी रवी आणि तामीळनाडू भाजप अध्यक्ष एल मुरुगन यांच्या उपस्थितीमध्ये चेन्नईत भाजपमध्ये प्रवेश केला. सी टी रवी यांनी शिवरामकृष्णन यांच्या भाजप प्रवेशावर आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणात प्रवेश न करण्याच्या निर्णयावरही प्रतिक्रिया दिली. रजनीकांत हे एक दिग्गज नेते असून त्यांचा आम्ही सर्व आदर करतो. रजनीकांत हे नेहमी तामिळनाडू आणि देशाच्या हिताची गोष्ट करतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.दरम्यान गेल्या काही दशकांपासून क्रिकेट आणि राजकारणाचा संबंध राहिला आहे. राजकारणात आतापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी प्रवेश केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, नवज्योत सिंह सिद्धू, किर्ती आझाद, विनोद कांबळी यासारख्या क्रिकेटपटुंचा समावेश आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

Previous Post Next Post