“हे सरकार गोरगरिबांच आहे की दारुवाल्यांचं?” : चित्रा वाघ

“हे सरकार गोरगरिबांच आहे की दारुवाल्यांचं?” : चित्रा वाघ

 “हे सरकार गोरगरिबांच आहे की दारुवाल्यांचं?” : चित्रा वाघमुंबई : हॉटेल्स आणि बारचालकांना मोठा दिलासा देत परवाना शुल्कात राज्य सरकारने ५० टक्क्यांची कपात केली आहे. मात्र आता यावरुन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय. “मंदिराच्या आधी बार उघडले. आता दारु परवान्यांवर थेट ५० टक्के सूट देण्याचा निर्णय तर मंत्रिमंडळाने घेतला आहे. कोरोनामुळे हॉटेल व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी सर्वच त्रस्त झालेले आहेत. सरकारकडे वारंवार मागण्या करुनही त्यांना काही मिळत नाहीय. मग हे सरकार दारुवाल्यांवर मेहरबान का? की दारुवाले सरकारमधील काही मंत्र्यांवर मेहरबान आहेत?, याचा शोध घेण्याची गरज वाटते. वीजबिलामध्ये सवलत द्या अशी मागणी केली. सरकारने सवलत दिली नाही. घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल कशामध्येच सर्वसामान्यांना दिलासा मिळाला नाही. हे सरकार गोरगरिबांच आहे की दारुवाल्यांचं?, दारुवाल्यांची सेवा हाच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम आहे का?”, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.सर्वसामान्य जनता वीजबिलात सुट द्या म्हणत रस्त्यावर उतरली घरपट्टी पाणीपट्टी कशातचं सुट नाही. लहानमोठ्या व्यापार्यांनी वांरवांर मागणी करून काही मिळत नाही. मात्र दारू परवान्यांवर थेट ५०% सुट सरकारने दिली दारूवाल्यांची सेवा हाचं महाविकास आघाडी सरकारचा कॉमन मिनीमम प्रोग्रॅम आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments