Type Here to Get Search Results !

कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केला रद्द




 कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केला रद्द



सातारा : राज्यातील सहकार क्षेत्रातील प्रसिद्ध कराड जनता सहकारी बँकेचा  बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला आहे. त्यानंतर सभासद आणि ठेवीदारांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान सहकार आयुक्तांनी बँक अवसायनत मध्ये गेल्याचं जाहीर केलं केले आहे. परवाना रद्द झाल्यानंतर त्यांनी बँकेची दिवाळखोरी जाहीर केली आहे. अवसायनिक म्हणून उपनिबंधक मनोहर माळी यांची या बँकेवर नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसणे आणि भविष्यातील उत्पन्नाची कमकुवत शक्यता लक्षात घेता केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला आहे.



2017 मध्ये कराड शहर पोलिसात जनता बँकेच्या संचालक मंडळासह काही अधिकाऱ्यांवर 310 कोटींच्या अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानंतर 6 ऑगस्ट 2019 रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधांनंतर कराड जनता सहकारी बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. बँकेबाबत अनेक आक्षेपार्ह गोष्टी समोर आल्यानंतर आज रिझर्व्ह बँकेने ही बँकिंग परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies