“मोदी सरकारसाठी आंदोलन करणारे शेतकरी खलिस्तानी, भांडवलदार मात्र पक्के मित्र” : या काँग्रेस नेत्याची मोदींवर टीका

“मोदी सरकारसाठी आंदोलन करणारे शेतकरी खलिस्तानी, भांडवलदार मात्र पक्के मित्र” : या काँग्रेस नेत्याची मोदींवर टीका

 
“मोदी सरकारसाठी आंदोलन करणारे शेतकरी खलिस्तानी, भांडवलदार मात्र पक्के मित्र” : या काँग्रेस  नेत्याची मोदींवर टीका नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावरून काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारसाठी आंदोलन करणारे शेतकरी खलिस्तानी आहेत मात्र 'क्रोनी कॅपिटलिस्ट' त्यांचे पक्के मित्र आहेत, असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मोदी सरकारसाठी विरोध करणारे विद्यार्थी देशद्रोही आहेत. चिंता व्यक्त करणारे नागरिक शहरी नक्षलवादी आहेत. प्रवासी मजूर कोरोनाचे प्रसारक आहेत. बलात्कार पीडित त्यांच्यासाठी काहीही नाहीत. आंदोलन करणारे शेतकरी खलिस्तानी आहेत आणि भांडवलदार मात्र पक्के मित्र आहेत" असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. याआधीही त्यांनी अनेकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments