सीबीआयप्रमाणे ईडीबाबतही महाराष्ट्रात परवानगीशिवाय न येण्याचा निर्णय घेण्याची गरज ; हसन मुश्रीफ

सीबीआयप्रमाणे ईडीबाबतही महाराष्ट्रात परवानगीशिवाय न येण्याचा निर्णय घेण्याची गरज ; हसन मुश्रीफ

 सीबीआयप्रमाणे ईडीबाबतही महाराष्ट्रात परवानगीशिवाय न येण्याचा निर्णय घेण्याची गरज ; हसन मुश्रीफकोल्हापूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीचे नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “ज्या पद्धतीने सीबीआयला महाराष्ट्रात तपास करायचा असेल तर परवानगी घ्यावी लागते. तसाच निर्णय ईडीबाबतही घेण्याची गरज आहे,” असे मत राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं.“ईडीचा वापर चुकीच्या पद्धतीने होत आहे. सुरुवातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीची नोटीस देण्यात आली. त्यानंतर मलाही नोटीस दिली. एकनाथ खडसे यांनाही नोटीस दिली आहे. त्यांनतर संजय राऊत यांच्या पत्नी यांनादेखील ईडीने नोटीस दिली आहे. हे सर्व सूडबुद्धीने होत आहे. ज्या पद्धतीने सीबीआयला महाराष्ट्रात परवानगीशिवाय येता येणार नाही, असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. तसाच निर्णय ईडीबाबतही घेण्याची गरज आहे. सध्या जे काही सुरु आहे त्यावरुन लोक ईडीविरोधात रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती आहे,” असे हसन मुश्रीफ म्हणाले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments