“मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही” : मुख्यमंत्र्यांची ग्वाही
 “मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही” : मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुंबई : मराठा आरक्षणाची आम्ही जिंकणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. “मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही”, असेही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. सभागृहात मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले. ते म्हणाले, 'माझ्या सहकारी मंत्र्यांनी समर्पक उत्तर दिले आहे. आता तुम्ही आमच्या मानगुटीवर बसायचे ठरवले असेल तर माहीत नाही. सर्वानुमते ही लढाई आपण लढतोय, ही लढाई जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही, ही लढाई जिंकावी, अशी माझी प्रार्थना आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही', अशी आठवणही त्यांनी या वेळी विरोधकांना करून दिली. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज जशीच्या तशी आहे. भूमिकेत बदल नाही, काहीही बदललेले नाही. वेळोवेळी संघटनांबरोबर चर्चा चालू असते, अशोक चव्हाण तर अनेक वेळा वकिलांबरोबर चर्चा करतात. ही लढाई सुरू असताना मध्येच कुणाच्या सडक्याो डोक्याअतून निघाले माहीत नाही. मराठा समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देताना दुसऱ्या समाजाचे आम्ही एक कणही काढणार नाही. समाजविघातक शक्ती जातीपातीत संघर्ष घडवून आणण्याचा, आग लावण्याचा प्रयत्न करत असतील तर, त्या आगीवर पाणी टाकावे लागेल. आपण टाकले नाही तर, राज्यातील जनता पाणी टाकेल. विरोधी पक्षांनी आमचे पुस्तक वाचन केले. आधी कुंडल्या बघत होते, कुंडल्या बघणारे आता पुस्तक वाचायला लागले, याचा आनंद आहे. मुहूर्त बघत होते, सरकार आज पडणार, उद्या पडणार. कुंडल्या कुणी कुणाच्या बदलू शकत नाही. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured