Type Here to Get Search Results !

मोदींचे कार्यालय ऑनलाइन खरेदी विक्री साइट ओएलएक्सवर ; 4 व्यक्तींना अटक
 मोदींचे कार्यालय ऑनलाइन खरेदी विक्री साइट ओएलएक्सवर ; 4 व्यक्तींना अटकनवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील नवीन संसदीय कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आले असून यावेळी पंतप्रधान मोदींचे वाराणसीच्या गुरुधाम कॉलनीतील कार्यालय काही खोडसाळ व्यक्तींनी ऑनलाइन खरेदी विक्री साइट ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवले. या कार्यालयाच्या विक्रीची जाहिरात ओएलएक्सवर पाहिल्यानंतर या कार्यालयाची विक्री नक्की कशासाठी होत आहे, त्यावर आता चर्चा सुरु झाली आहे. कार्यालयाच्या विक्रीसाठी या लोकांनी सुमारे साडेसात कोटींची किंमत ठेवली होती. या घटनेनंतर प्रकरणाची चौकशी सुरु झाली असून याप्रकरणी पोलिसांनी 4 व्यक्तींना अटक केल्याची माहिती मिळत आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी यांच्या संसदीय कार्यालयाच्या विक्रीची जाहिरात व्यावसायिक साइट ओएलएक्सवर लक्ष्मीकांत ओझा नावाच्या वापरकर्त्याच्या आयडीवरून शेअर करण्यात आली होती. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची माहिती देताना वाराणसीचे एसएसपी अमित कुमार पाठक यांनी सांगितले की, त्वरित ओएलएक्सवरील जाहिरात काढून टाकण्यात आली असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संसदीय कार्यालयाचा फोटो घेऊन ज्याने तो ओएलएक्सवर पोस्ट केला त्या व्यक्तीलाही अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ID 1612346492 ओएलएक्सवर दिलेल्या जाहिरातीचा क्रमांक असा होता. त्यामध्ये लिहिले होते, घराचा प्रकार- घरे आणि व्हिला, बाथरूमसह चार बेडरूम, पूर्ण फर्निचरसह सुसज्ज घर, इमारत क्षेत्र 6500 चौरस फूट, दोन मजली इमारतीमध्ये दोन कार पार्किंग विक्रीला असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. यासह ‘पीएमओ कार्यालय वाराणसी’ असे या प्रकल्पाचे नाव देण्यात आले होते. या जाहिरातीमध्ये कार्यालयाची किंमत साडेसात कोटी नमूद केली होती. विक्रेता लक्ष्मीकांत ओझा याने दिलेल्या मोबाईल नंबरवर अनेक कॉल आले, पण हे कॉल त्याने घेतले नाहीत. आता नक्की कोणत्या उद्देशाने ही जाहिरात देण्यात आली होती याची चौकशी सुरु आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies