कृषी कायद्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करावा : जयंत पाटील

कृषी कायद्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करावा : जयंत पाटील
 कृषी कायद्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करावा : जयंत पाटीलमुंबई : कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही या बंदला पाठिंबा दर्शवला असून नागरिकांनी बळीराजासाठी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जनतेला केले आहे. तसेच, हे काही राजकीय आंदोलन नाही म्हणून शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असंही पाटील म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी शांतपणे व कोविडकाळातील मर्यादांचे पालन करून या ‘भारत बंद’मध्ये सहभागी व्हावे व या कायद्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करावा. तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिल्याचे काल आम्ही जाहीर केले आहे. हा बंद फार वेगळ्या प्रकारचा आहे. जो शेतकरी आहे, तो संकट काळात राबत असतो, अस्मानी संकट असो सर्व संकटांशी शेतकरी सामना करत आहे. लॉकडाउनमध्ये सगळे घरी बसलेले असताता त्याने आपल्याला साथ दिली, शेतकऱ्यांनी आज आपल्याला साद दिली आहे.  त्याला आपली गरज आपण त्याला साथ द्यायला हवी. जनतेनं स्वच्छेनं बंदमध्ये सहभागी व्हावं. त्यामुळे हा बळीराजांना खरा पाठिंबा ठरेल' असं आवाहन पाटील यांनी केले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a comment

0 Comments