“अन्यथा पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू” : छत्रपती संभाजी राजे

“अन्यथा पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू” : छत्रपती संभाजी राजे

 “अन्यथा पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू” : छत्रपती संभाजी राजेपुणे :   शाहू महाराजांचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर शरद पवार यांनी सारथी संस्था जिवंत ठेवणे आवश्यक आहे. लवकरच शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन शेवटची विनंती करणार असल्याचे छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचे अभिष्टचिंतन करतो. शरद पवार हे शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत असेही ते म्हणाले.संभाजी राजे म्हणाले, सारथी संस्था ही छत्रपती शाहू महाराजांचे जीवंत स्मारक असुन, ते वाचवण्याची जबाबदारी ही महाविकास आघाडी सरकारची आहे. ते पुढे म्हणाले, एका बाजूला सरकारने सारथी संस्थेला स्वायत्तता असल्याचे सांगत असून कलम 25 नुसार संचालक आम्हाला काहीच अधिकार नाहीत, सरकार निर्णय घेईल असे सांगत आहे. 


यावरून अद्याप ही या संस्थेला स्वायत्तता दिलेली नाही. सारथी संस्था जिवंत राहणे गरजेचे असून तारदूतांचे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत. अन्यथा पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा ही छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी दिला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments