पंकजा मुंडे यांचे चॅलेंज ट्वीट ; तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायला जमेल का?…

पंकजा मुंडे यांचे चॅलेंज ट्वीट ; तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायला जमेल का?…
 पंकजा मुंडे यांचे चॅलेंज ट्वीट ; तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायला जमेल का?…भारतात सुमारे पाच महिने लोकं लॉकडाउनमध्ये होते. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या जुन्या आठवणी जागवल्या. काही लोकांनी आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे जुने फोटो शेअर केले. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकताच असा एक जुना फोटो पोस्ट केला आहे.सोशल मीडियावर अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सेलिब्रिटी किंवा नेतेमंडळी यांच्या प्रश्नांना चाहते उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतात. नुकताच भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी फोटो ट्वीट केला. या फोटोमध्ये असलेला माणूस कोण ते ओळखा पाहू… असं कॅप्शन त्यांनी फोटोसोबत जोडलं. या फोटोला दीड हजारांहून जास्त लाइक्स मिळाले असून अनेक युजर्सने हा फोटो रिट्विट केला आहे. तर सुमारे २०० लोकांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments