Type Here to Get Search Results !

पार्थ पवारांनी मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी : अमरजित पाटील



पार्थ पवारांनी मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी : अमरजित पाटील 


पंढरपूर : मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवरुन पार्थ पवार यांनी पोटनिवडणुक लढवावी, अशी मागणी माजी आमदार कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी केली असल्याने पंढरपूरच्या राजकारणात बरीच उलथापालथ होणार आहे. यासंदर्भात पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघ हा आदरणीय शरद पवार साहेबांना मानणारा परंपरागत मतदार संघ आहे.माझे आजोबा कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांचे व आदरणीय शरद पवार साहेब यांचे स्नेहाचे संबंध सर्वांना परिचित आहेत. 



सन १९९० साली आदरणीय पवार साहेबांच्या एका शब्दावर कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांनी विधानसभेला आपला उमेदवारी अर्ज माघारी घेऊन सुधाकर परिचारकांना निवडून आणले होते. या पार्श्वभुमीवर आम्ही पवार साहेबांच्या घराण्याप्रती आमची निष्ठा कायम ठेवून पार्थ पवार यांच्या उमेदवारीची मागणी आदरणीय पवार साहेबांकडे करितआहोत. तसे पत्र आम्ही आदरणीय पवार साहेबांना दिलेले आहे.



मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या गेली अनेक वर्ष प्रलंबित असणारा पाणी प्रश्न असेल अथवा पंढरपूर प्राधिकरणाला गती देऊन सर्व कामे दर्जेदार होण्याचा प्रश्न असेल किंवा पंढरपूर शहर तालुक्यातील एम आय डी सी चा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न भविष्यात तीव्र होणार आहेत.


 



या सर्व प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी या ठिकाणी आदरणीय अजितदादा पवार यांनीच खरे तर पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे नेतृत्व करण्याची गरज आहे. परंतु आदरणीय दादा हे सध्या बारामती मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत व उपमुख्यमंत्री आहेत. या पार्श्वभुमीवर पवार साहेबांच्या घरातीलच व्यक्तीने सदर मतदार संघाचे नेतृत्व करणे आवश्यक आहे. आणि ते पार्थ पवार यांनी करावे अशी आमची मागणी आहे.



अमरजित पाटील यांनी केलेल्या मागणीला पार्थ पवार यांचे वडील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख खासदार शरद पवार काय भूमिका घेतात यावरच मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची उमेदवारी कोणाला मिळणार ते समजणार आहे. परंतु पाटील यांनी केलेल्या मागणीमुळे पंढरपूरच्या राजकारणात मात्र सध्या, खरंच पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार का? मिळाली तर ते निवडून येणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. 



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज





إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies