तलाठी भरतीत मराठा उमेदवारांचा मार्ग मोकळा ; ७ जिल्ह्यात भरती : बाळासाहेब थोरात
 तलाठी भरतीत मराठा उमेदवारांचा मार्ग मोकळा ; ७ जिल्ह्यात भरती  : बाळासाहेब थोरात


मुंबई : महाविकास आघाडी सरकारने ७ जिल्ह्यामधील तलाठी पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा केलाय. त्यामुळे लवकरच या पदांसाठी निवडल्या गेलेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू करून घेतले जाणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही घोषणा केली आहे.मराठा आरक्षणाला सध्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय मात्र, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने प्रवेश प्रक्रिया आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायला सुरवात केली आहे. बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर या सात जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, तर इतर आरक्षणाचा विचार करून इतर उमेदवारांच्या भरतीची प्रक्रियादेखील पार पडली जाणार आहे.  
Post a Comment

Previous Post Next Post