कंटेनमेंट झोन बाहेरील जलक्रिडा प्रकार, नौका-विहार, इनडोअर मनोरंजन प्रकार,पर्यटक ठिकाणे अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगी

कंटेनमेंट झोन बाहेरील जलक्रिडा प्रकार, नौका-विहार, इनडोअर मनोरंजन प्रकार,पर्यटक ठिकाणे अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगीकंटेनमेंट झोन बाहेरील जलक्रिडा प्रकार, नौका-विहार, इनडोअर मनोरंजन प्रकार,पर्यटक ठिकाणे अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगीसांगली : कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाकडील दि. 21 डिसेंबर 2020 च्या पत्रान्वये कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलक्रिडा प्रकार, इतर जलक्रिडा प्रकार जसेकी नौका-विहार, मनोरंजन पार्क अंतर्गत इनडोअर मनोरंजन प्रकार, पर्यटक ठिकाणे आणि त्यासंबंधी ठिकाणे सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी गोपीचंद कदम यांनी प्राप्त अधिकारान्वये सांगली जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलक्रिडा प्रकार, इतर जलक्रिडा प्रकार जसेकी नौका-विहार, मनोरंजन पार्क अंतर्गत इनडोअर मनोरंजन प्रकार, पर्यटक ठिकाणे आणि त्यासंबंधी ठिकाणे सुरू करण्यासाठी खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी दिली आहे.कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलक्रिडा प्रकार जसेकी नौका-विहार हे सुरू करण्यास परवानगी असेल. याबाबत गृह (बंदरे) विभागाकडील निर्गमित करण्यात आलेल्या मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शन सूचना बंधनकारक असतील. कंटेनमेंट झोनच्या बाहेरील मनोरंजन पार्क अंतर्गत इनडोअर मनोरंजन प्रकार, पर्यटक ठिकाणे आणि त्यासंबंधित ठिकाणे सुरू करण्यास परवानगी असेल. याबबात पर्यटन संचालनालय (DoT) महाराष्ट्र शासन यांचेकडून निर्गमित केलेल्या दि. 24 डिसेंबर 2020 च्या पत्रामधील मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शन सूचना बंधनकारक असतील.यापूर्वी कोविड-19 व्यवस्थापनासाठी विहित केलेले शारिरिक अंतराचे व संसर्ग न पसरण्याबाबत वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावयाची असून या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हादंडाधिकारी गोपीचंद कदम यांनी जारी केले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments