‘केंद्राच्या धर्तीवर राज्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण’ : आरोग्यमंत्री
 ‘केंद्राच्या धर्तीवर राज्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण’ : आरोग्यमंत्रीमुंबई : “कोरोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण राज्यभरात पोहोचवण्यासाठी सर्व कामं पूर्ण झाली आहेत. आता केंद्र सरकार आणि औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहत आहोत,” असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. “लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे, आता फक्त केंद्राच्या परवानगीकडे लक्ष आहे,” असं राजेश टोपे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. 
राज्यातील लसीकरणाचा पहिला प्रयोग मुंबईतील केईएम रुग्णालयात केला जाणार आहे. पुढे ते म्हणाले की, “प्रत्येक राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने वाहतूक आणि कोल्ड चेनची व्यवस्था करण्याची गरज आहे. ते काम अत्यंत जलद गतीने महाराष्ट्रात सुरु आहे”. “अदर पूनावाला यांनीदेखील महाराष्ट्रात कोल्ड चेन, प्रशिक्षण आणि वाहतुकीबद्दल जे टार्गेट दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलं असल्याचं सांगितलं आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a Comment

Previous Post Next Post