Type Here to Get Search Results !

नाशिकमधून शिवसेनेला धक्का ; शिवसेनेच्या या नेत्याचा भाजपात प्रवेश

 



नाशिकमधून शिवसेनेला धक्का ; शिवसेनेच्या या नेत्याचा भाजपात प्रवेश 



मुंबई : शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपात जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. सानप भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतरही शिवसेनेकडून त्यांची मनधरणी करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेला यश आले नाही. दरम्यान, बाळासाहेब सानप यांनी आज भाजपात प्रवेश केला.



चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सानप यांचं स्वागत केलं. पक्षापासून दूर गेलेले सानप आज पुन्हा एकदा भाजपात परतले आहे. कुंभमेळ्यांच्या वेळी सानप यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. सगळ्या अडचणी दूर करत कुंभमेळा चांगल्या प्रकारे पाडला होता. सानप हे जमिनीशी जोडलेले नेते आहेत. कुणीही वाद करण्याचं कारण नाही. जुने-नवे अशी कोणतीही अडचण येणार नाही. आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे. नाशिक भाजपाचा बाल्लेकिल्ला झाला आहे. त्याच ताकदीने पक्ष मजबूत करायचा आहे,” असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies