Type Here to Get Search Results !

RBI ने बदलला ATM कार्डबाबतचा नियम ; १ जानेवारीपासून पेमेंट मर्यादा वाढविली



RBI ने बदलला ATM कार्डबाबतचा नियम ; १ जानेवारीपासून पेमेंट मर्यादा वाढविली  


नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी संपर्करहित कार्ड (Contact less Cards) ची पेमेंट मर्यादा २००० रुपयांवरून वाढवून ५००० रुपये केली आहे. १ जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे.  


कॉन्टॅक्टलेस ट्रान्झंक्शन म्हणजे काय? या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्ड होल्डरला एखाद्या ठिकाणी पैसे भरताना स्वाइप करण्याची आवश्यकता नसते. पॉइंट ऑफ सेल (POS) मशीनच्या जवळ कार्ड नेल्यास पेमेंट होऊ शकते. कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्डमध्ये दोन प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जातात - 'नियर फील्ड कम्युनिकेशन' आणि 'रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन' (आरएफआयडी). जेव्हा या तंत्रज्ञानासह सुसज्ज असलेले कार्ड मशीनजवळ योग्य पद्धतीने आणल्यास, स्वयंचलितपणे पेमेंट केले जाते.  


जर कार्ड मशीनच्या २ ते ५ सेंटीमीटरच्या रेंजमध्ये असेल तरच पैसे भरता येऊ शकतात. यासाठी मशीनमध्ये कार्ड इनसर्ट करण्याची किंवा ते स्वाइप करण्याची आवश्यकता नाही. या प्रणालीमध्ये पिन किंवा ओटीपीची देखील आवश्यक नाही. कॉन्टॅक्टलेस देयकासाठी कमाल मर्यादा २,००० रुपये होती. ती वाढवून आता ५ हजार करण्यात आली आहे. कोरोना काळात अशाप्रकारे मर्यादा वाढवल्यामुळे ग्राहकांना फायदाच होणार आहे. अशाप्रकारे एका दिवसात एकूण पाच संपर्कविहीन व्यवहार करता येतात. या रकमेपेक्षा जास्त देय देण्यासाठी, पिन किंवा ओटीपी आवश्यक आहे.


याशिवाय रिअल टाइन ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सेवा देखील 24x7x365 उपलब्ध करण्यास त्यांनी सांगितले आहे. पुढील आठवड्यापासून ही सेवा लागू करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे या माध्यमातून २४ तास पैसे ट्रान्सफर करू शकता. सध्या ही सेवा केवळ महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार सोडल्यास आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवसात सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies