टीआरपी घोटाळा प्रकरनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी अटकेत

टीआरपी घोटाळा प्रकरनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी अटकेतटीआरपी घोटाळा प्रकरनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी अटकेत


मुंबई : टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक केली आहे. आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यात एकूण 13 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.


टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांनी विकास खानचंदानी यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते.  त्यावेळी मात्र विकास खानचंदानी चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर ते क्राईम ब्रांचसमोर चौकशीसाठी हजर राहिले होते.


गेल्या तीन महिन्यांपासून टीआरपी घोटाळ्याचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांची चौकशी झाली असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच टीआरपी घोटाळ्या प्रकरणी पुढील तपास क्राईम ब्रांचकडून सुरु आहे.


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेसPost a comment

0 Comments