दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर

 दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर पुणे :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या  दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल हा 32.60 टक्के तर बारावीचा निकाल हा 18.41 टक्के लागला आहे.कोरोनाच्या परिस्थितीमुळे 10 आणि 12 च्या पुरवणी परीक्षा उशिराने पार पडल्या होत्या. त्यानंतर आज  दुपारी 1 वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात  दहावीचा निकाल 32.60 टक्के लागला आहे. तर बारावीचा निकाल 18.41 टक्के लागला आहे. निकाल हा  mahresult.nic.in इथेही पाहता येतील. दरम्यान, राज्यात कोविड-19 संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शासनानं लॉकडाऊन जाहीर केलं होतं. त्यामुळे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे निकाल जुलै 2020 मध्ये जाहीर करण्यात आले होते. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे अर्ज भरण्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याकडून परीक्षा अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी, याबाबतही परीक्षा मंडळानं सुचना दिल्या आहेत. ही प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांनी लॉग इन करावं,असं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

Previous Post Next Post