एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान ; अधिक वेळ थांबल्यास बस चालक-वाहकावर होणार कारवाई

एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान ; अधिक वेळ थांबल्यास बस चालक-वाहकावर होणार कारवाई
 एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान ; अधिक वेळ थांबल्यास बस चालक-वाहकावर होणार कारवाईमुंबई : एसटी बसेससाठी लांबच्या प्रवासादरम्यान विविध थांबे निश्चित करण्यात आले आहेत. जास्त वेळ एसटी एका थांब्यावर थांबणार नसल्याने एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. जर असा प्रकार उघड झाला तर बस चालक-वाहकाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. दिलेले थांबे याच्या व्यतिरिक्त जर गाडी थांबवली तर ही कारवाई करण्यात येणार आहे.एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान करण्यासाठी कुठल्याही हॉटेलच्या थांब्यावर बस १५ मिनिटांहून अधिक वेळ थांबल्यास संबंधित बस चालक-वाहकावर होणार कारवाई होणार आहे. एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांकडे यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. काही चालक-वाहक प्रवाशांना जेवणासह इतर सुविधांचा लाभ घेता यावा म्हणून जास्त वेळ बस थांबवून ठेवतात. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक विभाग नियंत्रकाला चालक-वाहकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments