या क्रिकेटपटूला सचिन तेंडूलकर यांनी ट्विटरवरुन वाहिली श्रद्धांजली

या क्रिकेटपटूला सचिन तेंडूलकर यांनी ट्विटरवरुन वाहिली श्रद्धांजली
या क्रिकेटपटूला सचिन तेंडूलकर यांनी ट्विटरवरुन वाहिली श्रद्धांजलीमुंबई : सचिन तेंडुलकरचे जवळचे मित्र आणि माजी क्रिकेटपटू विजय शिर्के यांचं कोरोना विषाणूमुळे निधन झालं आहे. मुंबईकडून खेळल्या जाणाऱ्या स्थानिक क्रिकेट खेळामध्ये त्यांचा समावेश होता. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. विजय शिर्के हे ८० च्या दशकात मुंबईकडून सचिन आणि विनोद कांबळी यांच्यासोबत खेळायचे. सचिनने ट्विटरवरुन त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.शिर्के यांच्या निधनामुळे मुंबई क्रिकेटला मोठा धक्का बसल्याची भावना बोलून दाखवली जात आहे. काही वर्षांपूर्वी विजय शिर्के हे मुंबईवरुन ठाण्यात स्थायिक झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments