“संजय राऊत यांचे कुटुंब ईडी समोर येत नाही, त्यांचे कुटुंब का दूर पळतय?” : या भाजपा नेत्याचा सवाल

“संजय राऊत यांचे कुटुंब ईडी समोर येत नाही, त्यांचे कुटुंब का दूर पळतय?” : या भाजपा नेत्याचा सवाल

 “संजय राऊत यांचे कुटुंब ईडी समोर येत नाही, त्यांचे कुटुंब का दूर पळतय?” : या भाजपा नेत्याचा सवाल मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज पीएमसी बँक घोटाळ्याच्या चौकशीसंबंधी ईडी समोर हजर होणार नाहीत. त्यांनी यासाठी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितली आहे. यावरून भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे.हे ईडीचे तिसरे समन्स आहे. पण संजय राऊत यांचे कुटुंब ईडी समोर येत नाही. त्यांचे कुटुंब का दूर पळत आहे. पीएमसी बँक, एचडीआयएल, प्रवीण राऊत कुटुंब आणि संजय राऊत कुटंब यांच्यातील कोट्यावधी रुपयांच्या व्यवहाराची ईडी चौकशी करत आहे. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या परिवारात काय खास नातं आहे? असं किरीट सोमय्या यांनी विचारलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments