भारताचा खास फलंदाज सुरेश रैनासह अनेक सेलिब्रिटीवर गुन्हा दाखल

भारताचा खास फलंदाज सुरेश रैनासह अनेक सेलिब्रिटीवर गुन्हा दाखल

 भारताचा खास फलंदाज सुरेश रैनासह अनेक सेलिब्रिटीवर गुन्हा दाखलमुंबई : राज्य सरकारने आधीच कोरोनाच्या परिस्थितीमुळे बार, पब आणि क्लबला कडक नियम घालून दिले आहे.  पण, नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे.   मुंबईतील ड्रॅगन पॅलेस पबवर पोलिसांनी भल्या पहाटे 2.30 वाजता छापा टाकला होता. या पबमध्ये सुरेश रैनासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजर होते. भारताचा खास फलंदाज सुरेश रैना आता वेगळ्याच प्रकरणामुळे अडचणीत सापडला आहे. मुंबई पोलिसांनी एका पबवर छापा टाकला आहे, या कारवाईत रैनावर कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुरेश रैनासोबत ह्रतिक रोशनची पत्नी सुझान खानवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पबला दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ हा पब सुरू होती तसंच पबमध्ये परवानगीपेक्षा जास्त गर्दी करण्यात आली होती. एवढंच नाहीतर कुणीही मास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत नव्हते. पोलिसांनी छापा टाकून एकूण 35 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सुरेश रैना, गायक गुरू रंधावा आणि सुपरस्टार ह्रतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सुरेश रैना याच्याविरोधात कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यासह सुझान खान, गुरू रंधावा यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. सकाळी सर्व सेलिब्रिटींना जामीन सुद्धा देण्यात आला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments