शिवसेना आक्रमक : मुंबईतील ED कार्यालयासमोर लावले असे बँनर

शिवसेना आक्रमक : मुंबईतील ED कार्यालयासमोर लावले असे बँनर

 शिवसेना आक्रमक : मुंबईतील ED कार्यालयासमोर लावले असे बँनर


मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्यानंतर शिवसैनिक आता आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी मुंबईतील ED कार्यालयासमोरच “भाजप प्रदेश कार्यालय” म्हणून बँनर लावले आहेत. सेना भवनसमोर महिला शिवसैनिकांची ईडी व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली.दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईडीच्या नोटीसीवरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. हा सरकार पडणायचा डाव असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला भाजपच्या हस्तकांनी या ना त्या प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. या हस्तकांनी मला 22 आमदारांची एकच यादी दाखवली. या आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला.

Post a comment

0 Comments