शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक पुन्हा अडचणीत ; पाकिस्तानी क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक पुन्हा अडचणीत ; पाकिस्तानी क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता

 शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक पुन्हा अडचणीत ; पाकिस्तानी क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरू आहे. पण आता प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने टाकलेल्या धाडीमध्ये सरनाईक यांच्या पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले असल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.प्रताप सरनाईक यांची दोन दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने जेव्हा छापा टाकला होता. त्यावेळी एक पाकिस्तानी क्रेडिट कार्ड आढळून आले होते. या क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे.पण, हे कार्ड सिंथिया दाद्रस यांच्या नावाने आहे. हे कार्ड  फेयरमॉन्ट बँक, कॅलिफोर्निया इथून देण्यात आले आहे. ईडीने या क्रेडिट कार्डबद्दलची माहिती आणि स्टेटमेंटची मागणी प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. तसंच ईडीने फेयरमॉन्ट बँकेकडेही याबद्दल माहिती मागितली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments